पुणे : बालगंधर्व रंगमंदिरसह शहरातील विविध नाट्यगृह बांधताना दिव्यांगाचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाट्यगृहात येवून सांस्कृतिक कार्यक्रम पाहणे शक्य होत नाही. तसेच अनेक दिव्यांग कलाकारांना शहरांमधील नाट्यगृहात येवून आपली कला सादर करण्याची इच्छा आहे. परंतु, बालगंधर्व सहित शहरातील अनेक नाट्यगृह अडथळा विरहित नाही. त्यामुळे शहरातील सर्व नाट्यगृह अडथळा विरहित करावेत, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने गुरूवारी करण्यात आली. दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या पटांगणात दिव्यांगांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे रफिक खान, दत्ताभाऊ भोसले, रामदास म्हात्रे, सुनंदा बाम्हणे, गुलाम मोमीन, दिनेश नलावडे, सुधा ढाकणे, रेवगनाथ कर्डिले, धमेंद्र सातव, सुप्रिया लोखंडे, माऊली वाघमारे आदी उपस्थित होते.महापालिकेतर्फे बालगंधर्व रंगमंदिराची इमारत नव्याने बांधण्याचा विचार केला जात आहे. मात्र, काही नागरिकांचा बालगंधर्व रंगमंदिराची जुनी इमारत पाडण्यास विरोध आहे. परंतु, नवी इमारत बांधली जाणार असल्यास संबंधित इमारत ही दिव्यांगांचा विचार करून बांधावी. दिव्यांगाना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावेत. त्यासाठी सर्व नाट्यगृह ‘बॅरिअर फ्री’करावेत्, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रफिक खान यांनी यावेळी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
बालगंधर्व अडथळा विरहित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 7:30 PM
बालगंधर्व रंगमंदिरसह शहरातील विविध नाट्यगृह बांधताना दिव्यांगाचा विचार करण्यात आलेला नाही.
ठळक मुद्देनवी इमारत बांधली जाणार असल्यास संबंधित इमारत ही दिव्यांगांचा विचार करून बांधावीशहरातील सर्व नाट्यगृह अडथळा विरहित करावेत, अशी मागणी