अवसरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत १ एप्रिलपासून अवैध दारू, मटका, गोवा-गुटखा विक्री बंद करण्याचा ठराव घेतला होता. मात्र, हा ठराव कागदावरच राहिला असून सर्व अवैध धंदे सर्रास चालूच आहेत. दारूमुळे गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
अवसरी बुद्रुक गावात सुद्धा दारूविक्री व टपऱ्यांवर गोवा-गुटखा विक्री होत आहे. अवैध दारू धंदे भरवस्तीत असल्याने दिवसभर शांतता भंग होत आहे, तसेच गावात तीन बिअरबार व परमीट रूम आहे मात्र दुकान मालकांनी दुकानाबाहेर बोर्ड न लावता बिअरबार चालू ठेवल्या आहेत. त्यामुळे हे बिअरबार अधिकृत आहेत किंवा नाहीत हे मंचर पोलस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी तपासावे. तसेच गावातील सर्वच अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी केली आहे.