दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपणास शासनाने कार्यालय चालू ठेवण्यासाठी सांगितले असले तरी आपल्या कार्यालयात बाहेर गावावरून दस्तऐवजाच्या निमित्ताने लोक येतात. जरी ऑनलाईन प्रकिया असली तरी ऑफलाईन प्रक्रिया किंवा ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी शेजारील ऑफिसमध्ये लोक येताना दिसतात, यामुळे प्रादुर्भाव होत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत स्थानिक पातळीवर संपूर्ण कार्यालयाचे कामकाज बंद ठेऊन गावाला कोरोनापासून बाहेर काढण्यास मदत करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
ॲड .महेश विठ्ठल ढमढेरे, सध्या शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही दस्तनोंदणी करीत आहे. शासनाने तळेगाव ढमढेरे येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ बंद करण्याचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य राहील. शासकीय आदेश मिळताच सर्व वकिलांच्या कार्यालयाचे कामकाज बंद ठेवू.
दुय्यम निबंधक कार्यालय बंद करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर त्वरित कामकाज बंद करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून सध्याचे कामकाज सुरू आहे.
- रवींद्र फुलपगारे, दुय्यम निबंधक अधिकारी, तळेगाव ढमढेरे
२६ तळेगाव ढमढेरे निवेदन
दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र फुलपगारे यांच्याकडे निवेदन देताना युवकांचे शिष्टमंडळ.