शिरूर - सातारा राज्य मार्गावरील चौफुला - सुपा दरम्यान अष्टविनायक मार्गाचे काम चालू झाले व आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा रस्तारुंदीकरण करताना व या मार्गावर येणाऱ्या ओढ्यावर मोरीचे काम करताना
शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ही नुकसानाचीभरपाई देण्याची मागणी केली जात आहे
या रस्त्याचे काम झाले, मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काय? संबंधित ठेकेदार नुकसानभरपाई व अपूर्ण राहिले ली कामे करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या रस्त्याचे काम जवळपास झाले दोन वर्षे चालू होते.
यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या शेती पिकांचे झालेले नुकसानी बरोबरच शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या वेळी पडवी येथील शेतकरी सोमनाथ शितोळे, विकास शितोळे, रमेश शितोळे, दत्तात्रेय शितोळे, संदीप शितोळे, अंकुश गायकवाड हे उपस्थित होते.
.
नुकसान दाखवताना शेतकरी