पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप व संचालक शंकरराव पवार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
उरुळी कांचन हे पुणे शहराजवळील सर्वांगीन विकसित होत असलेले हवेली तालुक्याच्या पूर्वेकडील उपनगर आहे, तसेच हे गाव आसपासच्या सुमारे २५ गावे आणि वाड्या-वस्त्यांची मुख्य बाजारपेठ आहे, त्याचबरोबर ही गावे ३ तालुक्यांच्या सीमेवर वसलेले असल्यामुळे ३ तालुक्यांमधील अनेक गावांचे मुख्य संपर्काचे ठिकाण झाले आहे, तर जवळच नांदूर - सहजपूर येथे एक औद्योगिक वसाहत आहे. या वसाहती मधील कामगार, अधिकारी वर्ग नियमित पुणे येथून ये-जा करीत असतो, याच बरोबर अनेक शैक्षणिक संकुले या परिसरामध्ये आहेत, अनेक व्यावसायिक आस्थापना ( बँका ,खाजगी कंपन्यांची कार्यालये, हॉस्पिटल्स, फर्निचरची दुकाने, कापडाची मोठी बाजार पेठ इत्यादी ) मोठ्या प्रमाणांमध्ये कार्यरत आहे. या सर्वांचा नियमितपणे पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, निगडी, मार्केट यार्ड, हिंजवडी आय टी पार्क आणि पुणे आणि परिसरासाठी येणे जाणे चालू असते.
ऊरुळी कांचन येथे एसटी महामंडळाचा डेपो अथवा बसस्टँड असे काहीच नाही, त्यामुळे येथे पुण्याहून आणि मुंबईवरून सोलापूर, लातूर, बार्शी, गुलबर्गा, विजापूर, उस्मानाबाद वा मराठवाडा आणि कर्नाटककडे जाणाऱ्या आणि परत मुंबई-पुणेकडे परतणाऱ्या एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवासीवर्गाची प्रचंड अडचण होते.त्यामुळे वरील २ मार्गावर दर ३० मिनिटांच्या अंतराने प्रवासीबस सुरू करण्यात यावी अशी सातत्याने ग्रामस्थ, कामगार, कॉलेज ची मुले, शेतकरी वर्ग आदी मागणी प्रवासी संघ उरुळी कांचन आणि सरपंच ग्रामपंचायत ऊरुळी कांचन यांच्याकडे करीत असतात. प्रवासी संघ ही सातत्याने यांचा पाठपुरावा करीत आहे. परंतु अद्याप पर्यंत सदरचे २ मार्ग सुरू झालेले नाहीत.खरे तर ऊरुळी कांचन ते स्वारगेट व ऊरुळी कांचन ते निगडी असे मार्ग पूर्वी सुरू होते आणि ते पी.एम.पी.एम.एल, ला अत्यंत चांगला नफाही देत होते असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.