कोरेगाव मूळ : कर्जमाफी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने शेतक-यांचा लोंढा महा ई-सेवा केंद्राकडे वाढत आहे. मात्र, आधार सर्व्हर चालत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.राज्य सरकारने १५ सप्टेंबर ही शेतकरी कर्जमाफी योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ठरवून दिली आहे. मात्र, मंगळवारी (दि. १२) सकाळी ९ पासून आधारचा सर्व्हर बंद असल्याने अनेक शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली असून कर्जमाफी आॅनलाईन अर्जाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.पूर्व हवेलीमध्ये लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, उरुळी कांचन अशा मोठ्या गावांमध्ये एकूण १२ महा ई-सेवा केंद्रे व सीएससी सेंटर आहेत. १५ सप्टेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने अनेक शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून त्या ठिकाणी गर्दी केली होती.शेतकरी नोंदणीसाठी आधार सर्व्हरला बोटांचे ठसे किंवा मोबाईल लिंक असणे महत्त्वाचे असते. मात्र, आधार सर्व्हर अनेक वेळा बंद पडत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, कर्जमाफीच्या अर्जाची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मुख्यमंत्र्यांकडूनही कबुलीराज्य सरकारने शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. शासनाने राज्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रे व सीएससी सेंटरवर शेतक-यांना अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.सुरुवातीच्या काळात आधार सर्व्हर सतत बंद पडत असल्याची माहिती महा ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरचालकांनी संबंधित अधिकाºयांना दिली. त्यानुसार महा ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरचालकांनी संबंधित अधिकाºयांच्या माध्यमातून वस्तुस्थितीची माहिती वरिष्ठ पातळीवर दिली.त्या वेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे आधार सर्व्हर व शेतकरी कर्जमाफीची वेबसाईट काही काळ बंद असल्याचे कबूल केले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागील आठवडाभर सर्व योजना व्यवस्थितपणे सुरू होती.
आधार सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी, शेतकरीवर्गातून नाराजी, कर्जमाफी आॅनलाईन अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 2:50 AM