शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पुण्यातील जम्बोत तरुणीचा मृत्यू! नातेवाईकांची चक्क गुन्हा दाखल करण्याची मागणी, वॉर्ड बॉयलाही मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:53 AM

रुग्ण सुरुवातीपासूनच गंभीर असल्याचा प्रशासनाचा दावा, तर वॉर्ड बॉयने गैरव्यवहार केल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्देतब्येत बिघडल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या या महिलेचा मृत्यू

पुणे: पुण्यातल्या जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये २५ वर्षीय बहीणीचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने एका पोलिस कॅान्स्टेबलने चक्क खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे. आपल्या बहीणीशी वॅार्ड बॅायने गैरवर्तणूक केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान मृत व्यक्ती ही दाखल झाली तेव्हा पासूनच गंभीर स्थितीत आणि व्हेंटीलेटर वर होती. त्यांच्या परिस्थितीविषयी नातेवाईकांना आधीच कल्पना देण्यात आली होती. तसेच या नातेवाईकांनी जम्बो च्या वॅार्ड बॅायला मारहाण केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून प्रशासनाकडून देखील नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. 

सीओईपी जम्बो रुग्णालयात एक माहिला उपचारांसाठी गेले काही दिवस दाखल होती. तब्येत बिघडल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या मृत्यू ला जम्बो प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कोल्हापूर मध्ये पोलिस असणाऱ्या बहीणीने याबाबत पोलिस तक्रार दाखल करुन घेण्याचा आग्रह धरला आहे. आपल्या बहीणीशी वॅार्ड बॅायने गैरवर्तणूक केल्याचा आरोप या महिलेच्या भावाने केला आहे. 

दरम्यान ही महिला १ तारखेला दाखल झाली तेव्हा पासूनच ती गंभीर होती. याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली होती असं स्पष्टीकरण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान नातेवाईकांनी वॅार्ड बॅायला मारहाण केली असा दावा करत जम्बो प्रशासनानेही नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस इन्स्पेक्टर निलिमा पवार म्हणाल्या की या प्रकरणात संपुर्ण चौकशी करुन मगच काय कार्यवाही करायची याचा निर्णय घेतला जाईल”

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल