पुणे : अक्षयतृतीयेला आमरस पुरीचा बेत व्हायलाच हवा. त्यामुळेच अक्षय तृतीयेला हापूस आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मार्केटयार्ड बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र चार ते पाच वर्षे नंतर पहिल्यांदाच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तयार आंब्याचा तुटवडा जाणवत असून पेटीमागे ५०० रूपये महाग मिळत आहेत.
यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलांमुळे बाजारात हापूसची आवक कमी झाली आहे. तसेच तयार हापूस बाजारात कमी उपलब्ध असल्याने भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे अजूनही हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ग्राहक खरेदीसाठी गेले असता त्यांना मालाचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे.
आंब्यांचे भावकिरकोळ बाजारातील डझनाचे भाव - ८०० ते १२०० रुपयेघाऊक बाजारातील भाव४ ते ६ डझन पेटी -२५०० ते ३००० हजार रुपये५ ते १० डझन पेटी - ३५०० ते ६००० रुपये पेटी
आंब्याची आवक कमी; दर मात्र सामान्याच्या आवाक्याबाहेर
दरवर्षी एप्रिल महिन्यात बाजारात हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर होते. एप्रिल महिन्यात आंब्यांची आवक वाढून दरही टप्प्याटप्प्याने सामान्यांच्या आवाक्यात येत असतात. गेल्या तीन दशकात एप्रिलमध्ये पहिल्यांदाच कोकणातील जयगड, देवगड, शिरगाव, पावस, जैतापूर परिसरातून होणारी आंब्याची आवक कमी झाली. आंबा लागवडीत घट झाल्याने त्याचा फटका छोट्या शेतकऱ्यांना बसला. असला असला तरी सद्या सामान्याच्या आवाक्या बाहेर हापूस आंबा गेला आहे.
काय आहेत महाग होण्याची कारणे:
- अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा उत्पन्नावर परिणाम- अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्यांची आवक कमी- दरवर्षी आठ ते दहा हजार हापूस पेट्यांची आवक- यंदा हापूसची आवक दोन ते अदीड हजार पेटीपर्यंत- किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचे ६०० ते १२०० दर चढेच- तयार आंबा बाजारात कमी उपलब्ध
यंदा हवामान बदलामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. आज मार्केट यार्ड बाजारात 2 ते अडीज हजार पेटी आल्या असून साधारण 800 ते 1200 रुपये डझन भाव आहे. चार ते पाच वर्षानंतर पहिल्यांदाच हापूस आंब्याच्या दराने उंचांक गाठला आहे. ग्राहक आंबा खरेदी करीत आहेत मात्र मालाचा तुटवडा जाणवत आहे. यंदा कोकणातील छोट्या बागयतदारांनी आंबा विक्रीस पाठविला नाही- युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड.