शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरेंनी...”: बाळा नांदगावकर
2
समर्थकाची बंडखोरी, अद्वय हिरेंचे आव्हान; दादाजी भुसेंची विजयाची वाट किती कठीण?
3
महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत
4
श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य
5
ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 
6
"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले
7
"गौतम गंभीरला पत्रकार परिषदेत बसवू नका, त्याचे शब्द..."; भारताच्या माजी क्रिकेटरचा BCCIला सल्ला
8
सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?
9
'घुसखोराने आदिवासी महिलेशी लग्न केले तरी...', झारखंडमध्ये अमित शहांचे मोठे आश्वासन
10
लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर दुश्मन कौशल चौधरीच्या पत्नीला अटक; खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप
11
'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींनी घणाघात
12
...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी
13
विधानसभा निवडणूक लढवण्यास का दिला नकार?, विनोद तावडेंनी सांगितली सगळी स्टोरी
14
पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल; शासकीय महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना
15
"अचानक घरगडी आणून..."; काँग्रेसमध्ये गेले म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सरवणकारंचे प्रत्युत्तर
16
खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय
17
तुलसी विवाह: तुमची रास कोणती? ‘हे’ उपाय करा, अनेकविध लाभ मिळवा; इच्छापूर्ती अन् फायदा!
18
शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी
19
भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले
20
Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

भिक्षेक-यांचा वात्सल्याचा बाजार

By admin | Published: February 25, 2015 12:50 AM

‘देवा सुंदर जगामध्ये का रे माणूस घडविलास, घडविलास तो घडविलास अन् दु:खामध्ये बुडविलास’ असं भिक्षेकऱ्यांच्या जीवनाचे सार सांगणारे गीत ऐकले की सहानुभूतीला पारावार उरत नाही

राहुल शिंदे, पुणे‘देवा सुंदर जगामध्ये का रे माणूस घडविलास, घडविलास तो घडविलास अन् दु:खामध्ये बुडविलास’ असं भिक्षेकऱ्यांच्या जीवनाचे सार सांगणारे गीत ऐकले की सहानुभूतीला पारावार उरत नाही. पण अशीच सहानुभूती मिळविण्यासाठी शहरात भिक्षेकऱ्यांकडून कोवळ्या, लहान मुलांचा वापर होताना दिसत आहे. या लहान मुलांच्या सहानुभूतीच्या संपत्तीवर लोकांच्या वात्सल्याच्या झऱ्यातून वितभर पोट भरण्याचे वास्तव पुण्यातील रस्त्यांवर सर्रास पाहायला मिळत आहे. कोवळ्या मुलांचं बालपण मात्र रस्त्यावर कोमेजत आहे. भिक्षेकरी असण्याच्या वेदनेचे चटके सोसणारी ही कोवळी मुलं रूक्ष होत चाललीत... मरणपंथाचे सारथी होत! बाबूराव बागुलांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहामधील अल्पवयीन सटवा आणि भागा आयुष्याकडे ‘मागतकरी’ म्हणून पाहत असतात आणि लुप्त होतात दुनियेच्या बाजारामध्ये कुठेतरी...! आजही तीच परिस्थिती आहे. जीवनाच्या संघर्षात आजचे सटवा अन् भागा भाकरीच्या शोधात रस्ते धुंडाळताहेत.. नियतीला सलाम ठोेकत...!शहरातील भिक्षेकरी दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या ५00 ते ६00 लहान मुले तर ११00 - ते १२00 तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग भिकारी भीक मागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही भीक मागण्यासाठी चिमुकल्या जीवांनाच वेठीस धरले जात आहे. परंतु, काही स्वयंसेवी संस्था वगळता शासन, पोलीस यंत्रणा आणि समाजाकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरात ५०० ते ६०० लहान मुले तर सुमारे ११०० ते १२०० तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग भिकारी भीक मागत आहेत. सिग्नलवर व उद्यानामध्ये लहान मुले सर्वाधिक प्रमाणात भीक मागताना दिसून येतात. परंतु, मुलांना भीक मागण्यास सांगून, या मुलांचे पालक दूरवर जाऊन उभे राहतात. काही महिला लहान मुलांना कडेवर घेऊन मुलाच्या दुधासाठी, त्याच्या उपचारासाठी भीक द्या, अशी गयावया करून भीक गोळा करतात. त्याचप्रमाणे भीक मागण्यासाठी लहान जीवांना वेठीस धरले जात असल्याचे काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही सांगितले जात आहे. पोलीस प्रशासनागे २0१४मध्ये केवळ ६0 भिकाऱ्यांवर कारवाई केली. तसेच सुमारे ३५ लहान मुलांना बाल सुधारगृहात दाखल केले.भिकाऱ्यांचे पुनर्वसनासाठी शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या भिक्षेकरी सुधारगृहांची संख्या दयनीय आहे. तसेच या सुधारगृहांमध्ये भीक मागणाऱ्या तरुण, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी ठोस उपाययोजना उपलब्ध नाही, असे नमूद करून डॉ. विनोद शहा म्हणाले, की डॉक्टर, वकील असे अनेक जण व्यसनाधिनतेमुळे भीक मागत असल्याचे दिसून आले आहेत. संस्थेने कात्रजजवळ भिलारेवाडी येथे भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सुरू केले आहे. सध्या या केंद्रात ६0 भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनाचे व १00 मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जात आहे.शहा म्हणाले, की भिक्षेकऱ्यांना प्राथमिक उपचार मिळाले तर ते समाजात ताठ मानेने जगू शकतात. एक भीक मागणारा मुलगा आता भोसरी येथील एका कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहे. कुठेही आजाराने ग्रस्त असलेला भिकारी दिसून आल्यास आमचे पदाधिकारी त्याच्यावर उपचार करण्यासाठी ससूनमध्ये दाखल करतात किंवा स्वत: जाऊन त्याला आमच्या संस्थेत घेऊन येतात.