महुडे : ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करावा व खात्यात सामाविष्ट करून घ्यावे, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व डाक कर्मचाऱ्यांनी पुण्यातील अधीक्षक डाकघर कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले.आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन यांच्या आदेशाने जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन स्वारगेट येथील ग्रामीण डाक अधीक्षक कार्यालयासमोर दुपारी १ वाजता केले. या धरणे आंदोलनात पुणे ग्रामीण डाक सेवक युनियनचे अध्यक्ष महेंद्र राऊत, सचिव एकनाथ मंडलिक, पोपट गोळे, शिवाजी मांढरे, सुनीता सोनवणे, संजय जगताप, मनोज डोंगरे, प्रकाश साबळे, अविनाश ढमाले, चंद्रकांत जाधव संतोष बुदगुडे, दत्ता वरे, सुभाष साळेकर, सुनील साळुंखे, तानाजी कुंभार, दिनकर बोडके तसेच संघटनेचे पदाधिकारी व महिला सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.दुपारी १ वाजता स्वारगेट पुणे येथील अधीक्षक डाक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सातवा वेतन आयोग मिळवा तसेच ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन पुणे डाक ग्रामीण विभागाचे अधीक्षक सदानंद होसिंग यांना डाक सेवक युनियनच्या वतीने देण्यात आले. सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आॅल इंडियन ग्रामीण डाक सेवक युनियनतर्फे संसद भवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे अध्यक्ष महेंद्र राऊत यांनी सांगितले.
ग्रामीण डाक सेवकांचे पुण्यात धरणे आंदोलन
By admin | Published: March 31, 2017 11:49 PM