तळेगाव ढमढेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाजार मैदानातील स्थानिक व्यावसायिक वसीम बागवान,इजाज बागवान, मुस्साभाई बागवान ,भरत घुमे ,महेंद्र गजरे, रेशमा घुमे ,प्रीती घुमे ,मंदा झनकार,बाबासाहेब शिनगारे, किरण भंडलकर यांनी याबाबत लेखी निवेदन ग्रामपंचायतीला दिले आहे.
एका व्यक्तीने ग्रामपंचायतीला निवेदन देऊन अतिक्रमण हटवावे व हातगाडी कडून रोजचा कर ५० रुपयेप्रमाणे ग्रामपंचायतीने वसूल करावा, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला जाईल.
बाजार मैदान येथे अवैध व्यवसाय करतात अशी खोटी तक्रार केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. येथील कायमस्वरूपी रहिवासी उदरनिर्वाहासाठी फळे विक्री, वडापाव हातगाडी व भाजीविक्री असे छोटे धंदे करून आपली उपजीविका चालवतात हे व्यवसाय अवैध होऊ शकत नाहीत हे व्यवसाय हातगाडी लावून करत आहेत. कोरोना काळात छोट्या व्यावसायिकांचे फार हाल झालेले आहेत.मिळणारे उत्पन्न देखील तुटपुंजे असे आहे.त्यामुळे पाथारीवाल्यांच्या कायद्याप्रमाणे अशा छोट्या व्यावसायिकांकडून कर घेणे ग्रामपंचायतीने सक्तीचे करू नये.जर कर घेतला तर तो अन्यायकारक आहे. ज्यांनी खरे अतिक्रमण केले आहेत त्यांना स्थाईक गाळे आहेत.त्यांना देखील एवढे भाडे नाही.तरी ग्रामपंचायतीने सहानुभूतीपूर्वक आमच्या अर्जाचा विचार करावा असे या निवेदनात म्हटले आहे.