त्याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार, जिल्हाधिकारी देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार शिरूर लैला शेख यांना देण्यात आले आहे, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे यांनी दिली.
शिरूर तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात दररोज १५ ते ३० रुग्ण आढळून येत आहे. दररोज वाढणारी आकडेवारी पाहता सध्या असणारे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मोलमजुरी करून उपजीविका करणारे गोरगरीब लोक असून, त्यांना खासगी रुग्णालयाचे बिल देणे अशक्य असते, त्यामुळे १०० ऑक्सिजन बेड व १० व्हेंटिलेटरचे कोविड सेंटर सुुरू करण्याची मागणी ॲड. रवींद्र खांडरे यांनी केली आहे.