निवेदनात म्हटले आहे की मंचर शहरात लॉकडाउन झाल्यापासून मीटरचे रीडिंग घेतले जात नाही. वीज ग्राहकांना अंदाजे बिले पाठवली जातात. वीजवापर कमी असतानाही अव्वाच्या सव्वा भरमसाठ बिले पाठवली जात आहेत. त्या बिलांच्या रकमा पाहून नागरिकांची मानसिकता बिघडली आहे. मार्च महिना असल्याने वीजबिल वसुली जोरात सुरू आहे. मात्र वीज वापर कमी असतानाही भरमसाठ येणारी बिले ग्राहक भरू शकत नाही. महावितरणने रीडिंगसाठी माणसे नेमून योग्य बिले द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
वीज वितरणचे कार्यालय मंचर येथून मणिपूर येथे हलवण्यात आले आहे. शहरापासून हे ठिकाण लांब आहे. त्यामुळे वीजबिलात दुरुस्ती असल्यास नागरिकांना लांबवर जावे लागत आहे.अनेक नागरिकांकडे स्वतःचे वाहन नसल्याने त्यांची धावपळ होत आहे. हे कार्यालय पूर्ववत मंचर शहरात आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
२४ मंचर
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.