लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : वाकड, थेरगाव, काळेवाडी परिसरात मुस्लिम समाज बांधवांची संख्या प्रचंड आहे़ मात्र, या भागात दफनभूमी नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे प्रशासनाने दफनभूमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी अपना वतन संघटनेने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अपना वतन संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची नुकतीच भेट घेतली. वाकड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, डांगे चौक, कस्पटेवस्ती, पिंपळेनिलख एवढ्या मोठ्या परिसरामध्ये पन्नास हजारांहून अधिक मुस्लिमांची लोकसंख्या आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी दफनभूमी अत्यावश्यक आहे, त्यासाठी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली. या वेळेस संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख, हरिशचंद्र तोडकर, असिफशेख, जमाँत ए इस्लामी हिंद चे मुजाहिद गढवाल, अपना वतन महिला आघाडीच्या सॅन्ड्रा डिसोझा, राजश्री शिरवळकर, अब्दुल शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दफनभूमीसाठी जागा देण्याची मागणी
By admin | Published: May 13, 2017 4:39 AM