कोविड लशीचे दोन डोस घेतलेले आहेत व लस घेतल्यानंतर, १४ दिवस पूर्ण झाल्यावर पुणे-लोणावळा-पुणे या रेल्वे मार्गावर प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे अशीच मुभा ज्या रेल्वेमार्गावर विद्युतीकरण झाले आहे अशा मार्गावर म्हणजेच पुणे -लोणावळा, दौंड- बारामती या मार्गांवर डायरेक्ट इमू / मेमू लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. इमू/मेमू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात. सातारा, पुणे- कोल्हापूर, पुणे -सोलापूर, पुणे- बार्शी या मार्गावर डेमू लोकल चालू करण्याची मागणीही रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आली. केडगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना आरक्षित तिकीट खिडकी उपलब्ध करण्याचीही मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. तसेच केडगाव रेल्वे स्टेशन वर पुणे- सोलापूर, पुणे हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे- हावडा, पुणे- पटना, पुणे -गोरखपूर व पनवेल- नांदेड- पनवेल या गाड्यांना जाता-येता एक मिनीटचा थांबा द्यावा अशीही मागणी मांडण्यात आली. सर्व मागण्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार कररून मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले.
इमू लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:13 AM