बाणेर येथील या जागेमध्ये तातडीने हॉस्पिटल तयार करणे शक्य होणार आहे, हे हॉस्पिटल कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून महानगरपालिकेने तातडीने बांधकाम व्यावसायिकांच्या सीएसआर फंडच्या माध्यमातून हॉस्पिटल तयार करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
बाणेर येथील सर्वे नंबर ३३ मधील आरक्षित वास्तूवरती हॉस्पिटल करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असून कायदेशीरबाबींची पूर्तता झाल्यानंतर, हे हॉस्पिटल तातडीने उभारले जाईल. याबाबत आश्वासित केले आहे.
बाणेर-बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, औंध तसेच या परिसराला लगत असलेल्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या व त्यांच्यावर उपचारासाठी आवश्यक असलेली हॉस्पिटल उभारणे हे पालिकेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या इमारतींमध्ये हॉस्पिटल्स उभारण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे.