कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारत घेऊन राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा- महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र,15 फेब्रुवारीपासून ऑफलाईन वर्ग घेण्यास परवानगी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील काही महाविद्यालयातील विद्यार्थी ऑफलाईन वर्गांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावत होते. तसेच महाविद्यालय प्रशासनाकडूनही कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन केले जात होते. त्यामुळे शहरातील काही नामांकित महाविद्यालयांनी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने वर्ग सुरू ठेवले.
ऑनलाईन पध्दतीने शिकवताना मर्यादा येत असल्याने काही विद्यार्थी ऑफलाईन वर्गांना उपस्थिती लावत होते. शिक्षकांना सुध्दा ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन वर्गात प्रभावीपणे शिकवणे सोपे जात असल्याने शिक्षकांकडूनही ऑफलाईन वर्ग सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते. येत्या 28 फेब्रुवारीनंतर पुन्हा ऑफलाईन वर्ग सुरू करावेत,अशी पेक्षा विद्यार्थी,पालकांसह शिक्षकाकडून केली जात आहे.