यातच परत लॉकडाऊन करून सलून व्यवसायवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता जगायचे कसे ? का मारायचे असा प्रश्न नाभिक समाजबांधवांसमोर उभा आहे. त्यामुळे या लॉकडडाऊमधून सलून व्यवसायिकांना वगळा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सर्व तालुक्यातून एकाच वेळी तहसीलदारांना निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्याचे नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली नाभिक समाजातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहलीदारांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सलून दुकाने पूर्ववत सुरू ठेवण्याबाबत परवानगी द्यावी, सर्व वयोगटातील सलून कामगार व व्यवसायिक यांना तत्काळ कोरोना लस देण्यात यावी. कोरोना काळातील आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. सलून व्यवसाय सुरू करायचे नसतील तर शासनाने राज्यातील प्रत्येक सलूनधारकास प्रतिमहिना वीस हजार रुपये मानधन द्यावे दुकानाचे भाडे वीज बिल माफ करण्यात यावी, या निवेदनाच्या प्रती संबंधित आजी मंत्री व माजी मंत्री यांना देण्यात आले आहे.
पुणे जिल्हा अध्यक्ष नाभिक महामंडळ रमेश राऊत यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तालुकानिहाय आमदार व तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष यांना निवेदन देण्यासाठी मार्गदर्शन केले.