पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलावर लवकरच पडणार हातोडा ; सर्वपक्षीय आमदार, प्रशासनाची तत्वत: मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:36 PM2020-04-28T17:36:36+5:302020-04-28T17:58:25+5:30
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा पूल पाडण्यास दाखवला हिरवा कंदिल..
पुणे : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान उभारण्यात येणा-या मेट्रो मार्गाकरिता विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासह आणखी दोन उड्डाणपूल पाडावे लागणार आहेत. हा पूल पाडण्यास पीएमआरडीएने घेतलेल्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी तसेच प्रशासनाने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली . दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा पूल पाडण्यास हिरवा कंदिल दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. हा पूल लॉकडाऊन काळात पाडणार की नंतर याकडे लक्ष लागले आहे.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग उन्नत स्वरुपाचा असून त्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका हद्दीत येत असलेल्या विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासह आणखी दोन पुलांचा अडथळा या मार्गामध्ये येत आहे. त्यामुळे हे पूल पाडण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमामध्ये केले होते. त्यानंतर या विषयाच्या चचेर्ला सुरुवात झाली होती.
दोन दिवसांपुर्वी पवार यांनी कोरोनासंदर्•ाात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणारी बैठक घेतली. पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिका-यांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये उड्डाणपूल पाडण्यासंदर्•ाात चर्चा केली. यावेळी सर्व आमदारही उपस्थित होते. तसेच पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. पवार यांनी हा पूल पाडण्यास हिरवा कंदिल दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठ चौकातील पूल २००६ साली राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेला असून हा पूल चुकल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. हा उड्डाणपूल पाडल्यानंतर तेथे मेट्रोसाठी उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने या उड्डाणपुलावर हातोडा कधी पडणार याकडे लक्ष लागले आहे.