शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलावर लवकरच पडणार हातोडा ; सर्वपक्षीय आमदार, प्रशासनाची तत्वत: मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:36 PM

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा पूल पाडण्यास दाखवला हिरवा कंदिल..

ठळक मुद्देपीएमआरडीएचा मेट्रो मार्ग : गणेशखिंड रस्त्यावरील एकूण तीन उड्डाणपुलांवर पडणार हातोडा हा पूल लॉकडाऊन काळात पाडणार की नंतर याकडे लक्ष

पुणे : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान उभारण्यात येणा-या मेट्रो मार्गाकरिता विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासह आणखी दोन उड्डाणपूल पाडावे लागणार आहेत. हा पूल पाडण्यास पीएमआरडीएने घेतलेल्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी तसेच प्रशासनाने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली . दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा पूल पाडण्यास हिरवा कंदिल दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. हा पूल लॉकडाऊन काळात पाडणार की नंतर याकडे लक्ष लागले आहे.पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग उन्नत स्वरुपाचा असून त्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका हद्दीत येत असलेल्या विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासह आणखी दोन पुलांचा अडथळा या मार्गामध्ये येत आहे. त्यामुळे हे पूल पाडण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमामध्ये केले होते. त्यानंतर या विषयाच्या चचेर्ला सुरुवात झाली होती.दोन दिवसांपुर्वी पवार यांनी कोरोनासंदर्•ाात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणारी बैठक घेतली. पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिका-यांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये उड्डाणपूल पाडण्यासंदर्•ाात चर्चा केली. यावेळी सर्व आमदारही उपस्थित होते. तसेच पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. पवार यांनी हा पूल पाडण्यास हिरवा कंदिल दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठ चौकातील पूल २००६ साली राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेला असून हा पूल चुकल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. हा उड्डाणपूल पाडल्यानंतर तेथे मेट्रोसाठी उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने या उड्डाणपुलावर हातोडा कधी पडणार याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMLAआमदारMetroमेट्रो