अनेक गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नव्हती. ही बाब लक्षात घेत महसूल विभागाने आपल्या पिकाची नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन निर्मिती केली आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची अचूक नोंदीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाणार आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे. या ॲपचे प्रात्यक्षिक पोलीस पाटील आप्पा गाढवे, रेशन दुकानदार पोपटराव सांगळे यांनी शेतकऱ्यांना दाखवले. या वेळी बिरंगुडी संस्थेचे अध्यक्ष सतीश सांगळे, माजी अध्यक्ष रामदास सांगळे, ग्रामपंचायत सदस्य अँड. दयानंद सांगळे, अमोल सांगळे, गणेश सांगळे, मुगाजी सांगळे उपस्थित होते.
बिरंगुडीत दाखवले ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:14 AM