यावेळी पिक काढल्यानंतर तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी ३ महिने आधी मातीचा नमुना परिक्षणासाठी कसा द्यावा याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविताना शेतकऱ्यांनी पुढील हंगामाच्या दृष्टीने माती परीक्षणा बाबतचे ज्ञान अवगत करून शेतावरील होणारा खर्च कमी करावा असे आवाहन केले.
यावेळी बाणखेले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने मातीचा नमुना घेण्याची कृती व त्यापासून होणारे फायदे याबद्दल माहिती दिली.शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निवारण केले. शेतातील मातीत असणारे विविध घटक, त्यांची कमतरता व त्यासाठी काय उपाययोजना करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा कस, मातीचा प्रकार व त्यानुसार घ्यायची पिके याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जमिनीची सुपीकता कशी वाढवावी, जमिनीमध्ये नसणाऱ्या घटकांची उणीव कशी भरून काढावी याबद्दल माहिती दिली.
या उपक्रमासाठी तिला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुमार हाडोळे,कार्यक्रम अधिकारी प्रा.परमेश्वरी पवार व प्रा.सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले.