शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

लिंगनिश्चिती कायद्यासंदर्भात निदर्शने

By admin | Published: January 31, 2016 4:30 AM

स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती आणि जनआरोग्य मंच यांच्या वतीने शुक्रवारी टिळक रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन व इंडियन रेडिआॅलॉजिस्ट असोसिएशन कचेरीसमोर

पुणे : स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती आणि जनआरोग्य मंच यांच्या वतीने शुक्रवारी टिळक रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन व इंडियन रेडिआॅलॉजिस्ट असोसिएशन कचेरीसमोर जाहीर निदर्शने करण्यात आली. गर्भलिंगनिदान कायद्याचे पालन न करणाऱ्या गुन्हेगार डॉक्टरांना अभय देण्याऐवजी मुलींना वाचवण्याचे काम डॉक्टरांनी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, मासूम संस्थेच्या डॉ. मनीषा गुप्ते, सम्यक संस्थेचे आनंद पवार, तथापि संस्थेच्या मेधा काळे व डॉ. संजय दाभाडे सहभागी झाले होते.डॉक्टरांच्या संघटनांनी कायदा व अंमलबजावणी यंत्रणेच्या विरोधात पुकारलेल्या मोहिमेवर त्यांनी टीका केली. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्यात कोणत्याही प्रकारे दुरुस्ती न करता त्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. कायद्याची अंमलबजावणी करणारी पुणे महापालिकेची अथवा राज्य सरकारची यंत्रणा जर डॉक्टरांना त्रास देत असेल किंवा भ्रष्टाचार करीत असेल, तर वरिष्ठ अधिकारी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांची त्वरित तक्रार करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करता येईल. पी.सी.पी.एन.डी.टी कायदा पुरेसा असून, त्यात व त्याच्या नियमांत दुरुस्ती करण्याची सध्या आवश्यकता नाही. मुलींची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियमित सनियंत्रण हीच काळाची गरज असल्याचे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.एफ फॉर्ममधील त्रुटी ही किरकोळ बाब ठरवून त्यांना क्षुल्लक गुन्ह्याचा दर्जा देणे म्हणजे कायद्याचे दात काढून घेण्यासारखे आहे. तसेच या फॉर्ममध्ये लिंगनिदान केलेले नाही, असे जाहीर निवेदन करावे लागते, जे डॉक्टर आणि लिंगनिदानाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे.या सर्व गोष्टींबाबतची सविस्तर चर्चा महापालिका आयुक्तांबरोबर ३ फेब्रुवारी रोजी करणार असल्याचेही किरण मोघे यांनी सांगितले.