पुणे: कोरोनाकाळात सुरक्षा साधने नसल्याने अंगणवाडी सेविकेचे निधन झाल्याचा आरोप करत अंगणवाडी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली.
सविता शिळीमकर या अंगणवाडी सेविकेचे कोरोनामुळे निधन झाले. प्रशासन या सेविकांना कोणतीही सुरक्षा साधने न देता त्यांना कोरोना रूग्ण सर्वेक्षण तसेच फिल्डवरच्या अन्य कामांना पिटाळत आहे. त्यांना साधे विमा सुरक्षा कवचही नाही, अशी टीका या वेळी सभेचे अध्यक्ष नितीन पवार यांनी केली.
अंगणवाडी सेविकांना मास्क, ग्लोज, सॅनिटायजर, फेसशिल्ड व पीपीई किट द्यावे, विमा काढावा, कोरोना झाल्यास उपचाराची व्यवस्था, खर्च सरकारने करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांंना देण्यात आले.
ॲड. मोहन वाडेकर, सुनंदा साळवे, शैलजा चौधरी, अनिता आवळे, घोरपडे, ॲड. मोनाली अपर्णा, कल्याणी रवींद्र निदर्शनात सहभागी झाले होते.