पुणे : सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये बिकिनी डान्स झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून इन्स्टिट्यूटसमोर निदर्शने करण्यात आली. तसेच सांस्कृतीक महोत्सवाच्या नावाखाली केलेल्या बीभत्स प्रकराबाबत संस्थेने जाहीर माफी मागावी, त्याचप्रमाणे यापुढील काळात अशा घटना घडणार नाहीत अशी ग्वाही देऊून हा कार्यक्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.पुणे हे विद्येचे माहेरघर असून, जगभरातील विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु, सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शहराच्या प्रतिष्ठेला काळिमा फासण्याचा प्रकार घडला आहे, असे निषेधाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सिंहगड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. तोकडे कपडे न घालता पूर्ण कपडे घालावेत म्हणून पदाधिकाऱ्यांना पंजाबी डे्रस भेट देण्यात आला. त्यावर येत्या आठवड्याभरात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल दिला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)सिंहगड कल्चरल सेंटरच्या माध्यमातून एका स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी ११ जानेवारी २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायकाच्या गाण्याचा कार्यक्रम होता. काही मुली स्टेजवर अधूनमधून नृत्य करण्यासाठी येत होत्या. या मुलींकडून केले जाणारे नृत्य भारतीय संस्कृतीमध्ये बसत नसल्याचे जाणवल्यामुळे संस्थेच्या पदाधिका-यांनी ते थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मुली नृत्य करणार असल्याची कल्पना संस्थेला नव्हती. - डॉ.सुनंदा नवले, सचिव, सिंहगड इन्स्टिट्यूट.
सिंहगड इन्स्टिट्यूटसमोर निदर्शने
By admin | Published: February 21, 2015 1:53 AM