शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विविध मागण्यांसाठी राज्यातील यूपीएससी विद्यार्थ्यांची दिल्लीत निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:25 PM

घोळ सारथी विद्यावेतनाचा

ठळक मुद्देमागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन दोन दिवसांत पैसे देण्याचे विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळाले नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरमहा एक तारखेला विद्यावेतनाची रक्कम मिळावी, सारथीचा स्वायत्त दर्जा कायम ठेवावा व पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे सोमवारी (दि. १७) आंदोलन केले. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून दोन दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले.   सकल मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या मूक मोर्चानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर स्वायत्त संस्थेची निर्मिती केली. त्यानुसार सारथी संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत नफा न कमावणाºया सरकारी कंपनीची स्थापना केली. या संस्थेने लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमधे प्रशिक्षणाची योजना जाहीर केली. त्यानुसार ७५ मुली आणि दीडशे मुले अशा २२५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जुलै-२०१९मध्ये दिल्लीला पाठविले. विद्यार्थ्यांना दरमहा १३ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. यातून विद्यार्थी राहण्याचा आणि भोजनाचा खर्च भागवतात.नोव्हेंबर महिन्यापर्यंत विद्यावेतन वेळेवर दिले जात होते; परंतु डिसेंबर महिन्यात ४ ते ५ दिवस उशीर झाला. जानेवारी महिन्याचे वेतन १ फेब्रुवारीला खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र, १७ दिवस उलटूनही ते जमा झालेले नाही. याविरोधात विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन केले. विद्यावेतनात उशीर होतोय, विद्यार्थी अस्थिर...गरिबांच्या मुलांना अधिकारी होऊ द्या... सारथी एक मृगजळ असे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबाबत दिल्लीमधे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा राजेश बोनवटे म्हणाला, ‘‘विद्यावेतन वेळेवर मिळत नसल्याने घरभाडे, अभ्यासिका शुल्क आणि खाणावळीचा खर्च भागविताना कसरत करावी लागत आहे. दरमहा दोन तारखेला विद्यावेतन दिले जावे. वारंवार भाडेकरार आणि इतर कागदपत्र देण्याची मागणी करू नये. बार्टीप्रमाणेच मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारास एकरकमी २५ हजार रुपये दिले जावेत.’’ मंत्री वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोन दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. सारथी संस्था ही स्वायत्तच असावी. यापूर्वीचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार असताना वेळेत विद्यावेतन मिळत होते. त्यानंतरही त्यांची जबाबदारी काढून अन्य अधिकाºयाकडे अतिरिक्त पदभार दिला. संस्थेला स्वायत्तता बहाल करून पूर्णवेळ अधिकाºयाची नेमणूक करावी, असे ओमकार पवार म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीStudentविद्यार्थीGovernmentसरकार