दौंड : दौंड-पुणे लोकलसाठी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याचे फलित म्हणून शनिवारी (दि. २५) पुणे-दौंड मार्गावर डेमू लोकल उद्घाटनाच्या निमित्ताने धावणार आहे. दौंड ते पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये या निर्णयामुळे आनंद आहे. ही लोकल दुपारी १ वाजता पुणे स्टेशनहून दौंडच्या दिशेने निघणार आहे. या गाडीतून खासदार सुप्रिया सुळे प्रवास करणार आहेत. दौंड ते पुणे दरम्यान हक्काची लोकल सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. लोकल सुरू व्हावी म्हणून प्रवासी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष वि. रा. उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९२ पासून पाठपुरावा सुरू केला होता. लोकल सुरू होण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. तांत्रिक अडचणींमुळे लोकलचा प्रश्न प्रलंबित राहिला. दौंड ते पुणे विद्युतीकरण होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. (वार्ताहर)दौंड ते पुणे ४ फेऱ्यापुणे : पुणे रेल्वे स्थानक ते दौंडदरम्यान दररोज दोन डिझेल मल्टीपल युनिट (डेमू) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातून सकाळी १०.३० आणि दुपारी २.२० वाजता ही गाडी सुटेल. तर दौंड येथून दुपारी २.१३ आणि सायंकाळी ६.१५ वाजता ‘डेमू’ पुण्याकडे रवाना होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे देण्यात आली. पहिली डेमू दौंडच्या दिशेने धावेल. ही गाडी दुपारी २.२७ वाजता दौंड स्थानकात पोहचणार आहे. रविवारपासून ही सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. दररोज पुण्याहून दोन आणि दौंड येथून दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.केडगावला होणार डेमूचे स्वागतकेडगाव : केडगाव व बोरीपार्धी ग्रामस्थ डीएमयूच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती बोरीपार्धीच्या सरपंच संगीता ताडगे व केडगावच्या सरपंच सारिका भोसले यांनी दिली. शनिवारी (दि. २५) डीएमयूचे अधिकृत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. प्रवासी संघटना व ग्रामपंचायतीच्या वतीने चालकाचा सत्कार करण्यात येईल. डीएमयू गाडीस पुष्पहार परिधान घालण्यात येईल. उपस्थितांना पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला जाईल.
प्रवासासाठी ‘डेमू’ लोकल सज्ज
By admin | Published: March 25, 2017 3:31 AM