(स्टार १११६ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकीकडे श्रावण महिना असल्याने फळांची मागणी वाढली आहे. मात्र, डेंग्यूच्या संकटाने ड्रॅगन फ्रुट आणखी महाग झाले आहे. ड्रॅगन फ्रुटची आवक कमी झाल्यामुळे आणि मागणीही वाढल्यामुळे ड्रॅगनचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. व्हाईट ड्रॅगन ८० ते १२० रुपये किलो तर रेड ड्रॅगन ८० ते १८० रुपये किलो दर आहे. ड्रॅगन फळाला डेंग्यूचे संकट आल्यामुळे खूपच मागणी वाढली आहे.
केवळ ड्रॅगन फ्रुट खाल्याने डेंग्यूवर मात्रा ठरते असे अजिबात नाही. ड्रॅगन फ्रुटबरोबर किवी आणि पपईचे सेवन केल्यासच मात्रा लागू होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आहे. त्यामुळे नागरिकांनी ड्रॅगन फ्रुट, किवी आणि पपईचे सेवन करणे आवश्यक आहे.
------
* फळांचे दर (प्रति किलो)
ड्रॅगन फ्रुट - ८०-१८०
डाळिंब - ८०-१३०
सफरचंद - ८०-१२०
संत्रा - ४०-६०
मोसंबी - २०-३०
चिकू - ३०-४०
पपई - २०-३०
पेरू - २५-३५
----
* डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंगीवर केवळ ड्रॅगन फ्रुटचा उतारा लागू होत नाही. तर ड्रॅगन फ्रुटबरोबर किवी, पपई अशी फळे खायला दिल्यास डेंग्यूच्या रुग्णांना त्याचा फायदा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
----
* आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
हिमाचल प्रदेशातील सिमला येथून सफरचंदाची पुण्यात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. यंदा सिमला सफरचंदाचे पीक जास्त झाले आहे. पुण्यातील बाजारात प्रचंड आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सफरचंदाचे दर उतरलेले आहेत.
----
* डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी झालेली असते. आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा समावेश करून प्लेटलेट वाढण्यात मदत होते. त्यामुळे रुग्णांना ड्रॅगन फ्रुट, किवी, पपई अशी फळे खायला द्यावीत. ड्रॅगन फ्रुटमध्ये ॲटी ऑक्सिडंन्ट तत्त्वांचाही समावेश असतो.
- कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ