नेहरुनगर : येथून श्री साई समाधी मंदिर व श्री साई द्वारकामाई सेवा समिती मंदिर या दोन्ही मंदिराच्या पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले. क्रांती चौकाजवळील समाधी मंदिरात सकाळी आरती केल्यानंतर फुलांनी सजविलेल्या रथातून पादुकांच्या पालखीचे प्रस्थान झाले. ढोल-ताशांच्या गजरात जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पालखीची क्रांती चौकातील गणपती मंदिरात पहिली आरती करण्यात आली. नंतर पालखी विठ्ठलनगर चौकामार्गे नेहरुनगर - भोसरी रस्त्यावरून हॉकी स्टेडियम चौकातील श्री साई द्वारकामाई सेवा समिती मंदिरात पोहचली. पालख्या १९ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे पोहचणार आहेत.क्रांती चौक येथील श्री साई समाधी मंदिराचा पहिला मुक्काम राजगुरुनगर, दुसरा नारायणगाव, तिसरा बोटा (जि. अहमदनगर), चौथा चंदनापुरी, पाचवा ताळेगाव दिघे, सहावा मुक्काम शिर्डी येथे होणार आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त पालखीप्रमुख ईश्वर गुंडे यांनी दिली. पाचवा जांभळवाडी, सहावा मुक्काम शिर्डी येथे होणार आहे. आयोजन नगरसेवक राहुल भोसले, साई द्वारकामाई सेवा समितिचे अध्यक्ष सतीश भोसले, साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष शेखर नलावडे, नामदेव शिंदे, एस. के. बिराजदार, चंदू पवार, रामा नलावडे, अनिल यादव आदींनी केले आहे. (वार्ताहर)
साईबाबा पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान
By admin | Published: November 15, 2015 12:57 AM