वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी उत्तराई पायी दिंडी सोहळा शनिवारी प्रतीकात्मकरीत्या पंढरपूरकडे निघाला. मात्र, सोहळ्यात खंड पडू नये म्हणून दिंडी सोहळाप्रमुख हभप माणिक महाराज पवार यांनी महर्षींच्या समाधीची व पादूकांची विधिवत पूजा करून पादुका पालखीमध्ये घेऊन पालखी खांद्यावर घेत मंदिर प्रदक्षिणा व ग्राम प्रदक्षिणा मारली. या वेळी उपस्थित वारकरी भक्तांनी टाळ,मृदंगाच्या तालावर हातात भगवी पताका घेऊन ज्ञानोबा-तुकाराम व महर्षी वाल्मीकीचा जय घोष करत व शासन नियमांचे पालन करीत व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ग्राम प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर संतांच्या आरत्या घेण्यात आल्या व आषाढी एकादशी पर्यंत पादुका मंदिरात ठेवण्यात आल्या असल्याची माहिती हभप माणिक महाराज पवार यांनी दिली.
या प्रतीकात्मक दिंडी सोहळ्यामध्ये प्रामुख्याने हभप माणिक महाराज, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, हभप अलका ताई आवळे, शोभा कदम, मीनाताई लोणकर, सुभाष आवळे, ज्ञानेश्वर भुजबळ, विलास भुजबळ, ज्ञानेश्वर कुदळे, हनुमंत पवार, वसंत नलावडे, किसन जगताप, छाया जगताप, तुकाराम भुजबळ, सुरेश राऊत उपस्थित होते.