सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असल्याने शासनाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व वीर देवस्थानच्या आवाहनानुसार अतिशय मोजक्या दहा भाविकांबरोबर पालखी रवाना करण्यात आली.
दरवर्षी पालखीमध्ये राजेवाडी गावातील सर्व नागरिक, महिला, तरुण पायी वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा येथील यात्रेसाठी जातात. या वेळी मात्र कोरोनामुळे सर्व भाविकांचा हिरमोड झाला आहे.
या दहा दिवसांच्या कालावधीत वीर येथील देवस्थानच्या सूचना व आदेशानुसार सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात येणार असून, वीर येथे प्रशासनाने परवानगी व कोरोना टेस्ट केलेल्याच मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहे. राजेवाडी पंचक्रोशीतील एकही भाविक वीर येथे येणार नसल्याची माहिती राजेवाडी येथील पालखीचे प्रमुख रामदास दादा बधे व हनुमंत बधे यांनी दिली.
राजेवाडीतून म्हस्कोबाच्या पालखीचे मोजक्या मानकऱ्यांसह वीरकडे प्रस्थान करण्यात आले.