संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी म्हणाले, पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. त्याचप्रमाणे जे वारकरी प्रत्यक्ष सोहळ्यात सहभागी होणार आहेत त्यांची आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. केवळ एक व्यक्ती वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता पादुका समाधी मंदिरामधून बाहेर आणून पालखीत ठेवल्या जातील. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात मंदिर प्रदक्षिणा होईल. तसेच १९ जुलैपर्यंत पादुका सभामंडपात पालखीत ठेवण्यात येवून वारीतील दैनंदिन कार्यक्रम करण्यात येतील. तसेच १९ जुलै रोजी एसटी बसने पादुकांचे क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होईल. वाखरी येथे पोहचून वाखरी ते पंढरपूर पायी वारी करून रात्री प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर येथे संत सोपानकाका मठात रात्रीचा मुक्काम होईल. आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत मुक्काम पंढरपूर मध्येच असेल पौर्णिमेस काला झाल्यानंतर परत सासवडकडे परतीचा प्रवास सुरू होईल.
फोटो ओळ ; संत सोपानदेव महाराज यांचा मुखवटा.