बारामती, सोलापूर,पंढरपूरमध्ये एनडीआरफच्या तुकड्या तैनात ठेवा: उपमुख्यमंत्र्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:58 PM2020-10-16T14:58:21+5:302020-10-16T15:10:19+5:30

पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश..

Deploy NDRF units in Baramati, Solapur, Pandharpur due to rain chances : Deputy CM orders | बारामती, सोलापूर,पंढरपूरमध्ये एनडीआरफच्या तुकड्या तैनात ठेवा: उपमुख्यमंत्र्यांचे आदेश 

बारामती, सोलापूर,पंढरपूरमध्ये एनडीआरफच्या तुकड्या तैनात ठेवा: उपमुख्यमंत्र्यांचे आदेश 

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विविध यंत्रणांकडून आढावा

पुणे : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामतीसह इंदापूर, सोलापूर आणि पंढरपूर चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याचे पवार यांनी सांगितले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 16) रोजी परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इत्यादी मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही  पवार यांनी दिले.


       

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बदलत्या हवामानानुसार पडणाऱ्या पावसाची नोंद घेत विभागातील परिस्थितीबाबत प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे करण्याची कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

 पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Deploy NDRF units in Baramati, Solapur, Pandharpur due to rain chances : Deputy CM orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.