शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कंपनीची संपत्ती विकून ठेवीदार आणि बँकांचे पैसे देता आले असते : डीएसके प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 8:54 PM

ज्यावेळी सर्वांना पैसे परत करायचे होते तेव्हा त्यांना संधी असताना देखील ते दिले नाहीत..

ठळक मुद्देडीएसके प्रकरणात सरकारी पक्षाचा युक्तिवाद : सोमवारी पुढील सुनावणी

पुणे : डीएसके यांना 2015 ते 2017 या काळात कंपनीची संपत्ती विकून ठेवीदार आणि बँकांचे पैसे देता येणे शक्य होते. पैसे असताना देखील त्यांनी प्रकल्प पूर्ण केले नाहीत. ज्यावेळी सर्वांना पैसे परत करायचे होते तेव्हा त्यांना संधी असताना देखील ते दिले नाहीत. संपत्ती विकली नसल्याची युक्तिवाद डीएसके प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी क रुन त्यांच्या जामीनाला विरोध केला. दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांच्या जामीन तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी आणि अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. सेझची जमीन नातेवाईकांच्या नावे खरेदी करून त्यासाठी डीएसकेडीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीतून पैसे दिले. या सर्वांत 184 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्यातून गुंतवणूकदार व आयकर विभागाची फसवणूक झाली आहे. सेबी आणि आरबीआयचे नियम लागू होऊ नये म्हणून डीएसकेंनी भागीदारी कंपन्या काढल्या. डीएसके डीएलमधील पैसे त्या भागीदारी कंपन्यांमध्ये वर्ग करण्यात आले. बँकांकडून ज्यासाठी पैसे घेतले ती कामे केलीच नाही. फुरसुंगी येथील जमिनीचा व्यवहार हा 2009 साली झालेला आहे. मात्र तो व्यवहार 2006 साली झाल्याचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या सर्व कटात आरोपींचा सहभाग आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला.  अश्विनी देशपांडे यांची या प्रकरणातील भूमिका काय होती हे दोषारोपपत्र नमूद आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी यांना केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (ता. 18) होणार आहे. 

* डीएसके ग्रुपने आत्तापर्यंत 50 लाख चौरस फुटाचे बांधकाम केले आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने त्यांना कोणतेही मोठी प्रलोभने दाखवली नव्हती. फायनान्स कंपन्या, बँक आणि ठेवीदारांकडून घेतलेले पैसे ग्रुपकडून 2017 पर्यंत नियमित परत करण्यात येत होते. या प्रकरणाचा फॉरेंसिक अहवाल देण्यात यावा, अशी सातत्याने मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप तो देण्यात आलेला नाही. पैसे एका खात्यातून दुस-या खात्यात पाठवले म्हणून फसवणूक होत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसD.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णी