संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींनी श्रींची प्रक्षाळ पूजा केली. यानंतर सकाळी सात वाजता सालकरी ढेरे यांची पूजा झाल्यानंतर, खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला. तर, दुपारी बारा वाजता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने पूजा व नैवेद्य दाखविण्यात आला. लॉकडाऊनमुळे मंदिर परीसरातील हार, दुर्वा, फुले, श्रींच्या प्रतीमांची दुकाने, पेढ्यांची दुकाने बंद असल्याने सर्वत्र नेहमी चतुर्थीला नेहमी गजबजणाऱ्या मंदिरासमोरील पेठेत शुकशुकाट जाणवत होता. मंदिरावर अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असल्याने कोरोनाचे संकट लवकर जाऊन मंदिर खुली व्हावीत, असे मत ‘लोकमत’शी बोलताना येथील पेढे व्यावसायिक अंकुश तावरे यांनी व्यक्त केले. दिवसभर तुरळक भाविकांची गर्दी सुरू होती. रात्री चंद्रोदयाच्या वेळेस मोजक्या पुजारी मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या आरतीनंतर श्रींस महानैवेद्य दाखविण्यात आला.
सकाळी पूजा झाल्यानंतर हातात पंचारती व अंगारा पात्र घेऊन मंदिरा सभोवताली प्रदक्षिणा घालण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे. याकाळात मंदिराचा मुख्य दरवाजा काही मिनिटे उघडा केला जातो. यावेळी मंदिरा बाहेर असणाऱ्या दगडी फरसावरून मयूरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोरगाव व परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
-
मयूरेश्वर मंदिराच्या पायरी दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.
३००५२०२१-बारामती-०६
-----------------------