सावित्रीबाई फुले स्मारकाजवळ युवा जोडो अभियानांतर्गत युवक-युवती आणि तृतीयपंथी मेळावा भरवला होता.
प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, महासचिव राजेंद्र पाटोदे, ऋषिकेश नांगरे पाटील, संतोष संखद यांनीही मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष मूनव्वर कुरेशी, प्रवीण गायकवाड, जितेंद्र जाधव, महेश कांबळे उपस्थित होते. गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांनी आघाडीत प्रवेश केला.
------------------------
दिव्यांग प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर
पुणे : डीकाई, अवनी संस्था आणि समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा दिव्य रत्न पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार विजेते भावेश भाटिया, दिव्य सेवारत्न पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक यजुवेंद्र महाजन आणि दिव्य कलारत्न पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रकाश मोहारे यांना जाहीर झाला आहे.
हा समारंभ ३ ते १० डिसेंबर या कालावधीत मॉडर्न शाळा शिवाजीनगर येथे होणार आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे, एसएमजी ग्रुपचे रमेश पाटील
उपस्थित राहणार आहेत.
४ ते ९ डिसेंबर या कालावधीत पद्मश्री राही पोपरे, पोपट पवार, भास्कर पाटील, दिव्यांग आणि महिला बचतगट, संशोधक अंकिता नगरकर, काशीनाथ नखाते, गिरीश प्रभुणे, डॉ अभिजित सोनवणे, डॉ राजेंद्र धामणे अशा उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वाचा देखील सत्कार करणार आहे.