शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

"जे झालं ते झालं, आता कशाला काढता..." ज्ञानवापीवरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 2:00 PM

अजित पवार यांनी ज्ञानवापी मशिदीच्या चर्चेवरून भाजपवर निशाणा साधलाय...

बारामती : आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आनखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात. तीनशे-चारशे वर्षांपूर्वी काही घटना घडतात. त्यानंतर आता असे मुद्दे देशात काढले जात आहेत. जे झालं ते झालं ते आता कशाला काढता, तुम्हाला काही करायचे असेल तर नवीन काहीतरी करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्ञानवापी मशिदीच्या चर्चेवरून भाजपवर निशाणा साधला.

बारामती येथील एका कार्यक्रमामध्ये रविवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कायदा सुव्यवस्था अडचणीत आणायची आणि वातावरण गढूळ करायचे, या गोष्टी बरोबर नाहीत. याची नोंद सर्वांनी घ्यावी. हा असं म्हणाला आता  तुमचं काय म्हणणं आहे? असे काही जन विचारतात. अरे तो म्हणला त्याच्याशी मला काय करायचे आहे. त्याचं म्हणणं त्याला लखलाभ मला माझं लखलाभ असो. एकान काही म्हणलं की दुसऱ्याने काहीतरी म्हणायचं हे काही बरोबर नाही, असे म्हणत माध्यम प्रतिनिधींना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.

जीएसटीबाबत केंद्र सरकार खुप आग्रही आहे. तुम्ही सांगितलेल्या अडचणी आम्ही फार तर जीएसटी कॉन्सिलसमोर मांडू परंतू राज्य सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. जीएसटी बाबत ज्या सुचना केल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमची अडचण होते. हे मलाही कळते. अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला.

ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले, उपमुख्यमंत्री पद आतापर्यंत मिळाले त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच ती लोकं निवडून देता. मला कोणावरही टिका करायची नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाकडी निंबोडी योजनेवरून सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार