"उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड अभ्यासू व कोणत्याही समस्यांवर तत्काळ उत्तर असणारे नेते!"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:56 PM2020-08-20T12:56:39+5:302020-08-20T13:43:56+5:30

येणाऱ्या काळात माझे कामच बोलेल आणि माझी योग्यताही सिद्ध करेल: नवनियुक्त जिल्हाधिका: डॉ.राजेश देशमुख यांना विश्वास

"Deputy Chief Minister Ajit Pawar is a leader who is very studious and has immediate answers to any problems: Dr.Rajesh Deshmukh | "उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड अभ्यासू व कोणत्याही समस्यांवर तत्काळ उत्तर असणारे नेते!"

"उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड अभ्यासू व कोणत्याही समस्यांवर तत्काळ उत्तर असणारे नेते!"

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्याचे जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांचा 'लोकमत'शी संवाद

प्रश्न : पुण्याचे जिल्हाधिकारी थेट आयएएस अधिकारी असणार की प्रमोटी अधिकारी खूप चर्चा होती. पुण्यात विभागीय आयुक्तासह दोन्ही महापालिकेचे आयुक्त थेट आयएएस अधिकारी आहेत. याचे दडपण वाटते का ?
- : या विषयावर मला काहीच बोलायचे नाही, पण येणाऱ्या काळात माझे कामच बोलेल व माझी योग्यता सिद्ध करेल. माझा टीमवर्कवर विश्वास असून, सर्वांना बरोबर घेऊन, लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन काम करण्याची पध्दत आहे. प्रश्न कितीही गंभीर असला तरी समन्वय साधून टीमवर्क केले की यश नक्कीच मिळते. 


प्रश्न : राजेश देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत, अशी चर्चा होते. तुम्ही सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी असताना अजित पवार यांच्या सोबत काम देखील केले. तुमचा अजितदादा सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशासकीय व शासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. बहुतेक सर्व शासकीय योजनांची बारकाईने अभ्यास आहे. ग्रामपंचायती पासून थेट मंत्रालयापर्यंत त्या अनेक लहान मोठ्या गोष्टींची त्यांना माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड अभ्यासू व कोणत्याही समस्यांवर तत्काळ उत्तर असणारा नेता आहेत. राज्य शासन व अजित पवार यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करणार. 

प्रश्न : राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असताना पुण्याचे जिल्‍हाधिकारी म्हणून तुमची निवड झाली आहे. कोरोनाचे हे आव्हान कसे स्वीकारणार ? 
- : सध्या कोरोनामुळे पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्याची रुग्ण संख्या राज्यात सर्वाधिक असून, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणणे मोठे आव्हान असल्याची जाणीव आहेच. रुग्ण संख्या अधिक असली तरी राज्यात सर्वाधिक कोरोना चाचण्या पुणे जिल्ह्यातच होत आहेत. तसेच रुग्णांना त्वरीत उपचार उपलब्ध करून देणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या कामाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा भाग आहे. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर या गोष्टी गांभीर्यने घेतल्या पाहिजेत. 
 

प्रश्न : पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कोणत्या घटकांना प्राधान्य देणार. कोणते प्रकल्प, योजना राबविणार व आव्हाने कोणती वाटतात ?
- : पुण्यात सध्या तरी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या उपाय योजना करू. परंतु कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वच विकास कामांना खीळ बसली आहे. आता या विकास कामांना गती देण्यासाठी वेगाने काम करणार.मला स्वत: ला हार्डवर्क करण्याची सवय आहे. यामुळेच तहसिलदारापासून सर्व प्रांताधिकारी यांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासला गती देणार.

Web Title: "Deputy Chief Minister Ajit Pawar is a leader who is very studious and has immediate answers to any problems: Dr.Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.