शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Pune: स्वतःच्या जिल्ह्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, सात जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 5:12 PM

आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे....

- नितीन शेळके

आळेफाटा (पुणे) : आळेफाटा येथे चिल्हेवाडी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा शुक्रवारी (दि.२५) दुपारी दुसऱ्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दरम्यान भूमिपूजन उरकून आळेफाटा येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना यावेळी आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माउली खंडागळे, शरद पवार गटाचे सुरज वाजगे यांसह इतर सुधीर घोलप, अनिल गावडे,योगेश तोडकर, राजेश भोर, चंद्रभान गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे २६ तारखेला मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.

मराठा आंदोलक अजित पवार यांना दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे, सभेच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात होता. मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. पिंपळवंडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजी आमदार शरद सोनवणे आळेफाटा पोलीस ठाण्यात -पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माउली खंडागळे, शरद पवार गटाचे सुरज वाजगे यांसह इतर  यांना ताब्यात घेतल्यानंतर माझी आमदार शरद सोनवणे पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यानंतर विघ्नहर साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, मयूर पवार, संजय बोरचटे यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे