करून दाखवलं! उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामती झाली 'कोरोनामुक्त', रुग्णांची संख्या शून्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:39 PM2020-04-30T18:39:54+5:302020-04-30T18:40:28+5:30
आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाले
बारामती : बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. त्याच्यावर पुणे शहरातील ससुन सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुुरु होते.या रुग्णाला गुरुवारी(दि ३०) डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती शहरात ७ तर तालुक्याच्या ग्रामीण भागात माळेगांव येथे एक कोरोना चा संसर्ग झालेला रुग्ण आढळला होता. शहरात श्रीरामनगर,समर्थनगरम्हाडा वसाहत परिसरात आजपर्यंत एकुण सात रुग्णसापडले आहेत.त्यापैकीसमर्थनगर येथील भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगांव येथील रुग्णाचा मृत्यु झाला आहे.१६ एप्रिल रोजी श्रीरामनगर येथील रिक्षाव्यावसायिक असणारा रुग्ण कोरोनामुक्त झाला. तसेच २३ एप्रिल रोजी भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाले.त्यापाठोपाठ शहरातील सातवा आणि शेवटचा रुग्ण असणारे ७५ वर्षीय रुग्णाचा आजचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.
या सर्वांवर पुणे शहरात उपचार सुरु होते.आज शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.यारुग्णाला १४ दिवस कोरंटाईन करण्यात येणार आहे.दरम्यान ,शहरातील कोरोनाचे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.मात्र,लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत निर्बंध कायमराहणार आहेत. वरीष्ठ पातळीवरील सुचनांनुसार त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे प्रांताधिकारी कांबळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
————————————————————