उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:46 PM2021-07-02T14:46:27+5:302021-07-02T15:03:17+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाबाबत महत्वाची घोषणा केली आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement; The corona vaccination in the state will be completed 31 August | उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार 

उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार 

Next

पुणे : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असतानाच मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या देखील  वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा, प्रशासन यांनी पूर्वतयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे राज्यात लसीकरण मोहीमही आहे. याच दरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यातील लसीकरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती व लसीकरणाबाबत माहिती घेतली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले,राज्यातील लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र, लसींचा पुरवठा हा कमी जास्त प्रमाणात होत आहे. तसेच लसींचा पुरवठा फक्त महाराष्ट्रासाठीच नसून इतर राज्यांना देखील तो केला जात आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असण्याची शक्यता आहे. लसींचा पुरवठा जर सुरळीत राहिला तर ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

पवार पुढे म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड तिसऱ्या टप्प्यात आणि ग्रामीण भाग चौथ्या टप्प्यात आहे. मात्र, आता ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच पुण्यातील लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, लसींच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याने काही अडचणी येत आहे. तरीदेखील लसीकरण पूर्ण करण्यात येईल.

Read in English

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement; The corona vaccination in the state will be completed 31 August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.