शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 4:29 AM

हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका

इंदापूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजूला ठेवून विरोधकांचे काम केले. अशा जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका करताना ते म्हणाले, जे भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप निवडून येईल, असा बऱ्याच लोकांचा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते.आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण ३० वर्षे राजकारणात झाली आहेत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा. ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा, अशी टोलेबाजीही पवार यांनी केली. त्यांच्या टोलेबाजीला कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस