महापौरांच्या प्रत्युत्तरांवर उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा! पुण्याच्या प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीला केले होते निमंत्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:39 PM2021-07-02T15:39:50+5:302021-07-02T15:49:06+5:30
मोहोळ यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून बैठकीला गैरहजर राहण्याची जोरदार उत्तरे दिली होती.
पुणे: पुणे शहरतील विविध प्रश्नांवर २९ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. मात्र या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रणच नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि महापौर यांच्यात खडाजंगीही झाली होती. मोहोळ यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून बैठकीला गैरहजर राहण्याची जोरदार उत्तरे दिली होती.
त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ''पुण्याबाबतच्या बैठकीला पुण्याच्या महापौरांना निमंत्रित केलं होतं. मी पण एक पुणेकर आहे. माझ्याकडून पुणेकरांचा अपमान होईल असं होणार नाही'' मी त्यांना बोलावले होते पण ते का आले नाहीत? हे आम्हाला माहित नाही. असा प्रकारचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
बैठकीला गैरहजर राहण्यावरून महापौर मुरलीधर यांनी एकलागोपाठ एक ट्विट करत दिली होती उत्तरे
दरम्यान बैठकीला गैरहजर राहण्यावरून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकलागोपाठ एक असं करत अनेक ट्विट केले होते. “राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी” असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिल होत आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करुन महापौरांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा दावा राष्ट्रवादीने केला होता. तसेच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील ‘अडगळी’चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. म्हणूनच वाट्टेल ते बोलायचं, चर्चेत येण्याचा प्रयत्न करताना लोकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करायची, ही त्यांची नेहमीची वृत्ती पुणेकरांनी चांगलीच ओळखली. म्हणूनच की काय २०१७ साली ते महापौर असताना त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी झिडकारुन लावले.” अशी टीका त्यांनी केली होती.
महापौर होते आई-वडिलांसमवेत मुळशीला
बैठकीच्या दिवशी महापौर मुळशी तालुक्यातील गावी आई-वडिलांसमवेत होते. बैठकीला त्यांना निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच त्यांनी गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहून फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची? बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?” असा सवालही मोहोळ उपस्थित केला होता.