घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व लोकांमधून सरपंच निवडी झाल्या. आता यानंतर उपसरपंच यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही निवड प्रक्रिया होणार आहे.
जानेवारी २०२३ मध्ये ३ रोजी तळेघर, डिंभे खुर्द, घोडेगाव, साल आंबेदरा या ग्रामपंचायतींची उपसरपंचाची निवड होणार आहे. दि. ४ रोजी गंगापूर खुर्द, चिंचोडी, चांडोली बुद्रूक, कळब, पारगाव तर्फे खेड या ग्रामपंचायतींची उपसरपंच निवड होणार आहे. दि. ५ रोजी मेंगडेवाडी, धामणी, भावडी, नारोडी, गोहे खुर्द, निघोटवाडी या ग्रामपंचायतींची उपसरपंच निवड होणार आहे. दि. ६ रोजी रांजणी, चिखली, नागापूर येथील उपसरपंच निवडी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
उपसरपंच निवडीसाठी प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये मोठी राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे. उपसरपंच निवडीसाठी प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये मोठी राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.