दौंड : गिरीम (ता. दौंड) परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीलगत असणाऱ्या खडकवासला कालव्यातून वितरिका क्र. २९ तसेच येथील ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या कार्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सरपंच सविता मांढरे यांनी दिली. गिरीम व परिसरातील जाधववाडी, वायरलेस फाटा, पुनर्वसन मांढरेमळा, गोरेमळा, बारववस्ती व आसपासच्या वाड्यावस्त्यांवर पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. येथील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडल्याने ग्रामपंचायतीने नवीन बोअरवेल तसेच विहिरीचे खोलीकरण केले असले तरीदेखील पाण्याची समस्या मिटू शकली नाही. त्यामुळे गिरीमगावच्या ओढ्याला खडकवासला कालव्यातून पाणी सोडले तर विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होऊन शकते. रंगनाथ फुलारी, सरपंच सविता मांढरे, उपसरपंच जयराम शिंदे, भीमराव तालवर, संतोष जाधव, ताईबाई झिटे, शाम साबळे, पुष्पा फुलारी, किसन होले, जालिंदर जाधव, तळसाबाई फुलारी, ग्रामसेवक ज्ञानदेव लोणकर यांनी विहिरीची पाहणी केली आहे. (वार्ताहर)
पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
By admin | Published: January 22, 2016 1:32 AM