उरुळी कांचन : उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना जिथं २ तासांचा प्रवास आहे तिथं त्यांना ४ तास घालवावे लागत आहे. यामुळे प्रवाशांबरोबरच येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या खड्डेयुक्त रस्त्याने जाताना वाहनांचेही अतोनात नुकसान होत असून इंधनही जास्त लागत आहे. म्हणजे वेळेबरोबरच पैशाचे नुकसानाही या लोकांना सहन करावे लागत आहे. परंतु यावर नाईलाज असल्याने या रस्त्याचा वापर करूनच प्रवासांना खड्ड्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात २० नोव्हेंबर २०१८ रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांत झाडे लावून सरकार, लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याच्या अधिकाºयांचा पुरंदर हवेली तालुक्यातील जनतेने तीव्र निषेध करूनही अद्याप लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यापैकी कोणालाच घाम फुटला नाही, अशी जळजळीत प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देविदास कांचन यांनी दिली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबाचे दर्शनासाठी जाणाºया भाविकांचे उरुळी कांचन ते जेजुरी रस्त्यावर असणाºया मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणेदेखील मुश्कील झाले आहे.जेजुरी, नीरा, लोणंद, सातारा, सांगली, फलटण, पंढरपूर, तसेच सासवड, नारायणपूर देवस्थान, केतकावळे बालाजी, भोर, मोरगावचा मयूरेश्वराचे दर्शनासाठी लाखो भाविक या रस्त्याने दररोज ये-जा करीत असतात. यामुळे या रस्ताची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाºयांना वेळोवेळी या रस्त्याबाबत लेखी-तोंडी निवेदने देऊनही त्या अधिकाºयांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर असणाºया खड्ड्यांत भरच पडली आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, असेही देविदास कांचन यांनी सांगितले.रस्त्याकडे पुरंदर व शिरूर हवेली तालुक्यातील लोकप्रतिनिधी जे सत्ताधारी आहेत त्यांचे दुर्लक्ष आहेच पण अधिकाºयांनी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हजारो प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यातील खड्ड्यांमुळे होणारे वाहनाचे नुकसान, आर्थिक व शारीरिक नुकसान कधीच भरून येणारे नाही, अशी भूमिका उरुळी कांचन ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी डॉ. बापूसाहेब धुमाणे यांनी मांडली ते म्हणाले की सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुसत्याच वल्गना केल्या २०१७ अखेर एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही.पण २०१८ उलटून गेले तरीही खड्डे वाढले पण रस्ते काही सुधारले नाहीत! सरकारने ज्या अधिकाºयाच्या हद्दीतील रस्ते खराब असतील व तो त्याची योग्य ती देखभाल दुरुस्ती वेळेवर लक्ष देऊन करणार नाही त्याचे पगार थांबवावेत व त्या पैशांतून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 2:21 AM