मांडवगण फराटा आरोग्य केंद्र अंतर्गत तांदळी इनामगाव शिरसगाव वडगाव रासाई बाभुळसर बुद्रुक या पूर्व भागातील अनेक गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्याचा आकडा झपाट्याने वाढत आहे.शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन हे कागदी पत्र राहिलेली आहे . किरकोळ व्यापारी,भाजी विक्रेते,फळविक्रेते अशा काही ठराविक विक्रेते हे तोंडाला मास्क न लावताच भाजी विक्री करत असतात.तसेच काही नागरिक हे मास्क न घालता तसेच सर्वत्र फिरताना दिसून येतात.
दोन आठवड्यांपूर्वी या परिसरात कोरोना रुग्ण संख्या कमी होती मात्र या आठवड्यात बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून अनेक नागरिक विविध खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.परिणामी परिसरातील अनेक दवाखाने हे देखील पुन्हा भरण्याच्या मार्गावर असून कोविड सेंटर सुरू करावे लागेल की काय अशी शंका निर्माण झाली आहे . प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मंजुषा सातपुते यांनी सांगितले की, रूग्ण संख्या वाढत असताना नागरिक गांभीर्याने काळजी घेत नाही,तसेच ज्या व्यक्तींच्या कोरोना रुग्ण सापडले आहे.त्यांनी त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत.सर्वांची तपासणी करावी असे सांगितले
.
मांडवगण फराटा येथे आठवडे बाजार नसताना देखील शुक्रवारी मुख्य रस्त्यावर आलेले बाजाराचे स्वरूप व झालेली गर्दी