वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील जवळजवळ ५० किलोमीटर नदीचे पात्र कोरडे पडल्याने थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून मृगजळाच्या झळा सहन करण्याची वेळ येथील शेतक-यांवर आलेली आहे. नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.नीरा नदीचे पाणी हे तीन जिल्ह्यातील शेतक-यांना वरदान ठरलेले असले, तरी गेल्या सहा वर्षांपासून शेतकºयांची दयनीय अवस्था झालेली आहे. चार वर्षे सतत पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोरडी ठणठणीत पडल्याने पाणी मिळवण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आलेली होती. यावर्षी योग्य वेळी मुबलक पाऊस धरणक्षेत्रात होऊनही नदीच्या पात्रात थेंबही पाणी नसल्याने पुन्हा एकदा शेतकºयांना पाण्यासाठी पायपीठ करण्याची वेळ आलेली आहे. या परिसरातील शेतकºयांना निरा डाव्या कालाव्याची सुविधा नसल्याने पाण्यासाठी भटकंती शिवाय पर्याय नाही. नदीच्या पाण्याच्या विश्वासावर शेतकºयाने जनावरासाठी चारा पिके घेण्यात आलेले आहेत.परंतु, पाणीच नसल्याने जागेवर पिके वाळून गेलेली आहेत. चिखली, कुरवली, कळंब, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, पिठेवाडी, सराटी, बावडा नीरानृसिंहपूरपर्यंत जवळजवळ ५० किलोमीटरचा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणी मिळण्यासाठी येथील शेतकºयाने नदीच्या पात्रात ७ दिवस उपोषण केले. अनेक लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेटी घेतले. उपोषणकर्त्यांची परिस्थिती बाहेर गेल्यानंतर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मुंबईला येथील शिष्यमंडळ पाणी सोडण्यात यावे म्हणून जलसंपदा मंत्री पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले. परंतु या शेतकºयाची व्यथा कोणत्याही शासकीय अधिका-यांनी समजून घेतलेले नाही. मोकळ्या हाताने शेतकरी पुन्हा वैशाख वणव्यातील झळा सोसत आहेत.शासन दरबारी येथील शेतक-यांना काळ्या पाण्याची शिक्षाच ठोठावलेले असल्याचे येथील शेतकºयांतून बोलले जात आहे. शेतकºयाचे हित लक्षात घेऊन शासनाने गांभीर्याने विचार करून जनारांना पिण्यासाठी चारा पाण्याचा विचार करून पाणी सोडण्यात यावे अशी, आर्त हाक येथील शेतकरी मारत आहे.
उपोषणानंतरही शेतकऱ्यांना पाणी नाहीच, ५० किलोमीटरचे पात्र कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 2:20 AM