येरवडा - मनुष्यवध,जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगून वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे मागील सात वर्षांपासून गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरून येरवडा कारागृहात रवानगी केली. अनिकेत जगन्नाथ काकडे (वय २३ येरवडा) याला एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करत त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. अनिकेत काकडे याच्यावर सदोष मनुष्यवध,जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगून वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे मागील सात वर्षांपासून सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्हे करत त्याने येरवडा परिसरात दहशत माजवली होती. त्याच्या गंभीर गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याच्याकडून येरवडा परिसरात आणखी गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी याबाबत अनिकेत काकडे यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १९ मार्च रोजी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आतापर्यंत शहरातील १६ सराईत गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यानुसार येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
सन २०२१ मध्ये केलेली ही नववी कारवाई असून अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर या पुढील काळात देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.