पुणे : मध्यरात्री दीड वाजलेला होता़ अचानक गाडीचा सायनर वाजू लागला. झोपेत असलेल्या त्यांना हा तर आपल्या गाडीचा सायनर असल्याचे लक्षात आले, ते तातडीने उठले व त्यांनी खिडकीतून पाहिले तर, त्यांच्याच गाडीचा सायनर वाजत होता. त्यांनी आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न करीत दरवाजाकडे धाव घेतली. ते दरवाजा उघडून बाहेर आले़ तोपर्यंत चोरट्यांनी ती कार घेऊन जात होते. त्यांच्या डोळ्यादेखत कार चोरीला जात असल्याचे त्यांनी पाहिले. कर्वेनगरमधील युनायटेड वेस्टर्न कॉलनी ही शनिवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. शहरातून आणखी एक फॉरच्युनर गाडी चोरीला गेली.
या प्रकरणी अजित हरिभाऊ खिसे यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शहरात आतापर्यंत किमान ५ फॉरच्युनर गाड्या चोरीला गेल्या असून चोरटे हे अतिशय सफाईने फॉरच्युनर गाड्याच चोरुन नेताना दिसतात़ भाजपा नगरसेवक दीपक पोटे यांनी सर्वप्रथम फॉरच्युनर गाडी चोरीला गेली होती़ त्यांची गाडी राजस्थानमध्ये आढळली होती़ मात्र, त्यानंतर शहरातून एका पाठोपाठ ४ फॉरच्युनर चोरीला गेल्या़ त्यांचा काहीही तपास अद्याप लागला नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अजित खिसे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी युनायटेड वेस्टर्न कॉलनीतील आपल्या घराच्या बाहेर कंपाऊंटला शुक्रवारी रात्री फॉरच्युनर पार्क केली होती़ मध्यरात्री दीड वाजण्याच्या त्यांना त्यांच्या गाडीचा सायरन ऐकायला आला़ त्यांनी उठून पाहिले तर त्यांच्या गाडीचा सायरन वाजत होता़ ते बाहेर येईपर्यंत चोरट्यांनी गाडी स्टार्ट करुन ते चोरुन घेऊन गेले़ अजित यांना आपली गाडी चोरीला जाताना पाहण्याशिवाय काही करता आले नाही़ त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. मात्र, गाडीचा तपास लागू शकला नाही़ पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे अधिक तपास करीत आहेत. या अलिशान कारच्या सॉफ्टवेअरचा पार्ट बदलून चोरटे अवघ्या १७ मिनिटात गाडीवर कब्जा मिळवितात आणि चोरुन नेतात़ या पूर्वी चोरी झालेल्या दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांची चोरीची पद्धत लक्षात आली होती. पण अजूनही ते चोरटे हाती लागू शकले नाही़ ही गाडी चोरताना पहिल्यांदाच सायरन वाजला. पण चोरी रोखता आली नाही़ फॉरच्युनर चोरट्यांनी पुणे पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे.